राजापूरात खाडीत बुडून चार भावंडांचा मृत्यू
रत्नागिरी/
राजापुर तालुक्यातील नागार इंगळवाडी येथील एका खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू झालाय. खाडीमध्ये मुळे आणि शिंपले काढण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील पाच मुले खोल पाण्यात बु़डाली, यापैकी एका लहान मुलीला वाचवण्यात यश आलं पंरतु या घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय.”
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले आई-वडिलांसोबत कालवे काढण्यासाठी गेलेली होती. जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या मुलांसह आज खाडीत मुळे व कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्यातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले पाण्यात बुडाली. त्यातील एका मुलीला वाचवण्यात आले; मात्र इतर चार भावंडांचा दुर्दैवी अंत झाला.यात मोहम्मद जुनेद भाटकर , जुहेरिया जुनेद भाटकर , बुशिरा जुनेद भाटकर , माहिरा जुनेद भाटकर यांचा मृत्यू झालाय. खाडीतील पाणीचा अंदाज न आल्यानं पाच मुले खोल पाण्यात बुडाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.”


