न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मळेवाड येथे पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ

 

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे 

    ‘सेवेचा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’ हा संदेश घेऊन मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे रविवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मळेवाड येथून शुभारंभ झाला.

याप्रसंगी मंडळ अध्यक्ष मधु देसाई, उपसभापती गौरव मुळीक, हेमा मराठे, पंचायत समिती सदस्या धनश्री मराठे, पंचायत समिती सदस्य अंकित धाऊस्कर, अण्णा झाट्ये, दादा परब, सिद्धेश नाईक, किरण पालयेकर, नारायण कांबळी, सिद्धेश कांबळी, किसान मोर्चा अध्यक्ष केशव नाईक आणि ओंकार आजगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिरासाठी रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, अथायु हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉ.डी.वाय. पाटील हाॅस्पीटल यांचे सहकार्य लाभले.

ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजसेवेतून वाढदिवस साजरा करण्याचा विशाल परब यांचा संकल्प या महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून साकार होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे