न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पो. निरीक्षक मगदूम यांची भेट 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

  सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, सदस्य रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, रवी जाधव व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमीच पोलीस यंत्रणेला सहकार्य करत असते.

निस्वार्थपणे सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या या सेवाभावी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन मगदूम यांनी यावेळी घेतला. आपल्या संस्थेसोबत काम करायला मला नक्कीच आवडेल कारण समाजामध्ये निस्वार्थपणे सेवा देणारे तुमचे कार्य खरेच कौतुकास्पद आहे. तुम्हा सर्वांना भेटून खूप बर वाटले, अशी भावना यावेळी मगदूम यांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे