सावंतवाडीतील बाबी सुकी यांचे निधन
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
वैश्यवाडा सावंतवाडी येथील रहिवासी अनंत वामन सुकी उर्फ बाबी सुकी (८९) यांचे दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुली, जावई, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. वैश्यवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते बंड्या सुकी यांचे ते वडील होत.


