इचलकरंजीत शेअर मार्केटच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक
कोल्हापूर/
इचलकरंजी शहरातील दत्तनगर-कबनूर परिसरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 14 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने संशयित आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


