तिरोडामध्ये शाळेचा गेट कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू
गोंदिया/
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरोडा येथील नगरपरिषद संचालित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा, लोधीटोला येथे शाळेचा जीर्ण गेट अचानक कोसळला, यामध्ये पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


