कोयत्याने वार करून दुखापत केल्याच्या आरोपावरून सागर साळुंखे यांची निर्दोष मुक्तता
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
फिर्यादीवर कोयत्याने वार करून दुखापत व शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या गंभीर आरोपावरून सागर आबा साळुंखे यांची सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीम. जे.एम .मिस्त्री यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड अनिल कृष्णा निरवडेकर , अँड गणेश चव्हाण, अँड दत्तप्रसाद ठाकूर, अँड केतन जाधव व अँड वामन गवस यांनी काम पाहिले




