कोनशीतील बाबलो वरक यांची खुनाच्या प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील कोनशी टेंबवाडी येथील बाबलो शंकर वरक यांच्याविरुद्ध गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात सरकारी पक्षाने सात साक्षीदार तपासले.
मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याने न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपी बाबलो शंकर वरक यांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींच्या बाजूने अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर यांच्यासह इतर वकिलांनी काम पाहिले.


