कणकवलीत महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी चोरले
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
कणकवली तालुक्यातील आशिये सोनगेवाडीत काल(बुधवार) रात्री ९च्या सुमारास दुचाकी वरून घरी जाणा-या रिचा यासह(४३) हिचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. ६ ग्रॅम चे ५०हजाराचे मंगळसूत्र होते.


