न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला तितीक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित “तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार २०२६” समारंभात कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर यांच्या वृत्तबद्ध कवितांच्या “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह” हा तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आला. शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या तितिक्षा कला साहित्य संमेलनात सदर पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी तितिक्षा भावार्थ पुणे या संस्थेकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. या पुरस्कारांसाठी डिसेंबर २०२४ ते मार्च २६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या ललित, कविता, कथा, कादंबरी, नाटक, लेख संग्रह, विनोदी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, शैक्षणिक, बाल साहित्य अशा विविध साहित्य प्रकारात लेखन करणाऱ्या सारस्वतांकडून साहित्यकृती मागविण्यात आल्या होत्या. संस्थेकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून दिनांक २५ मे २०२६ रोजी विविध प्रकाराच्या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले. दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला मिळालेल्या पुरस्कारासाठी त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे