ज्योर्तिंलिंग भिमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनी दर्शनासाठी खुले होणार…१५ जून पासून दर्शन सुरू
पुणे/
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर गेली पाच महिने बंद असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र, श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर अखेर येत्या १५ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भाविकांना आता दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शनाचा लाभ घेता येणार असून, ऑनलाइन नोंदणीद्वारे रोज केवळ १,००० भाविकांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे भीमाशंकरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता आधीच ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य असणार आहे.


