वैभववाडी तालुक्यातील करूळात एका दिवसात सहा वनराई बंधारे
सिंधुदुर्ग / राजू तावडे
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कुरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने नदीपात्रात अवघ्या एका दिवसात तब्बल सहा वनराई बंधारे उभारण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून, नदीकाठच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
पाणीसाठा वाढल्याने शेतीसाठी तसेच नदीकाठच्या विहिरींसाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
कुरूळ ग्रामपंचायतीने पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नदीपात्रात वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. ग्रामस्थांच्या सहकार्याने अवघ्या एका दिवसात सहा बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये सध्या चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे.
या उपक्रमामुळे शेती, नदीकाठच्या विहिरी आणि पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मोठी मदत होणार असून, जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


