चिपळूण जवळ कंटेनरला दुचाकी आदळून एक गंभीर
रत्नागिरी/
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे-डेरवण फाटा येथे दुचाकी आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शंकर पाटील, जे सावर्डा भुवडवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत, ते गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.


