देवदूत बनलेल्या प्रकाश वेंगुर्लेकर यांचा सावंतवाडीत सत्कार
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
सावंतवाडी बाजार पेठेतील दुकाने अग्नी प्रलयातून वाचविण्यासाठी मोलाची कामगिरी करणारे प्रकाश वेंगुर्लेकर यांचा अनिल भिसे मित्र मंडळातर्फे हेमंत मुंज, प्रदीप नार्वेकर, परशुराम चौगुले, रत्नाकर माळी, प्रदीप नाईक, संदीप धारगळकर, अनंत मेस्त्री, इरफान शेख, अजित सावंत, संतोष होईल ,अनिल भिसे जिल्हा पत्रकार कार्यकारिणी सदस्य यांचे तर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


