न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

लाडक्या बहिणींना दीड हजार, पण पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे अडीच हजारही थकीत!

सिंधुदुर्ग / मनोज घाटकर

गरजू महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना पोषण आहार तयार करून देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या या महिलांना जून महिन्यापासून मासिक मानधन मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. महिन्याला अवघे अडीच हजार रुपये मानधन मिळणाऱ्या या महिलांना तेही वेळेवर मिळत नसेल, तर जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची घोषणा करून सरकार महिलांच्या सक्षमीकरणाचा गवगवा करत आहे; मात्र दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचे तुटपुंजे मानधनही वेळेवर दिले जात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. महिलांच्या सन्मानाच्या आणि कल्याणाच्या घोषणा करणाऱ्या सरकारने प्रत्यक्ष काम करणाऱ्या या महिलांच्या आर्थिक अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

जून महिन्यापासून थकीत असलेले मानधन तातडीने अदा करावे, यापुढे प्रत्येक महिन्याचे मानधन नियमितपणे द्यावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या महिला कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन त्वरित कार्यवाही केली नाही, तर संबंधित महिला कर्मचाऱ्यांकडून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात येत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे