न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दोडामार्ग महाआरोग्य शिबिराचे अतुल काळसेकर यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्ग / राजू तावडे

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी विचारांतून, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेने भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला. आरोग्यसेवा ही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, अशा उपक्रमांमुळे नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यास मदत होते.

या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य भाजपा उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी गोवा राज्य भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर, भाजपा युवा नेते विशाल परब, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, श्री. पराशर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले. यावेळी भाजपा राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोवा राज्य भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तुषार केळकर, सचिव श्री. केणी , जिल्हा परिषद सदस्य श्वेता धरणे, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, सभापती पार्वती गवस, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर , सदस्या सोनाली नाईक, पराशर सावंत, डॉ. बाबासाहेब राणे यांसह अन्य मान्यवरांचे सन्मान करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे