न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बालरोग तज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांचे निधन 

 

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

    सावंतवाडीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अरविंद दत्तात्रेय खानोलकर यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी सोमवारी सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. गेले चार दिवस ते आजारी होते. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. खानोलकर यांनी गेली ६० हून अधिक वर्षे सावंतवाडीत वैद्यकीय सेवा दिली. गांधी चौक परिसरात त्यांचा दवाखाना होता. ते गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जात होते.

अचूक निदान करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे कोणत्याही तपासण्या किंवा महागडी औषध न देता सर्वसामान्यांना रुग्णाला परवडेल असे औषध त्यांच्याकडून दिली जात होती. त्यामुळे बांदा, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ल्यासह पंचक्रोशीतील अनेक रुग्ण त्यांच्याकडे येत होते. श्री. खानोलकर हे स्पष्ट वक्ता होते. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती.

त्यांचे वडील डॉक्टर डी. बी. खानोलकर यांनी अनेक वर्ष बांदा येथे रुग्णसेवा केली होती. गरिबांचे डॉक्टर म्हणून संपूर्ण दशक्रोशी मध्ये ते ओळखले जात होते. त्यांचाच वारसा पुढे डॉक्टर अरविंद यांनी चालविला. वडिलांची इच्छा होती म्हणून डॉ. अरविंद खानोलकर यांनी बांद्यात अनेक वर्षे रुग्णसेवा दिली.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे