न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सावंतवाडीतील श्री देव पाटेकर मंदिराला दिली भेट

सिंधुदुर्ग / राजू तावडे

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी आज सावंतवाडीतील श्री देव पाटेकर मंदिराला भेट देत देवदर्शन घेतले. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी त्यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले.

यावेळी सावंतवाडी राजघराण्यासह जिल्ह्यातील वकील मंडळींकडून बी. आर. गवई यांचे सावंतवाडीत स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर त्यांनी देवस्थान परिसराची पाहणी केली. तसेच मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि सावंतवाडी संस्थानच्या परंपरेविषयी माहिती जाणून घेतली.

यावेळी युवराज लखमराव भोसले, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, मुंबई-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा सदस्य अॅड. संग्राम देसाई, अॅड. अनिल निरवडेकर, अॅड. शमराज सावंत, अॅड. संदीप निबाळकर यांच्यासह अनेक वकिलांनी बी. आर. गवई यांची भेट घेतली.

या भेटीमुळे सावंतवाडीतील ऐतिहासिक श्री देव पाटेकर मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, माजी सरन्यायाधीश गवई यांच्या भेटीची स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे