कुडाळात युवतीचा खून
सिंधुदुर्ग /ऋत्वीका पालकर
कुडाळ तालुक्यातील कडावल ते वर्दे या मुख्य रस्त्यापासून सुमारे ७० मीटर अंतरावर एका काॅलेज युवतीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सदर मृत युवतीचे नाव दामिनी किरण पालव ( २० , वर्दे – खालची पालववाडी ) असे आहे. कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने भोसकून तिचा क्रूरपणे खून करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दामिनी ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करत होती. या दरम्यान, त्याच रस्त्याच्या दरम्यान काळा शर्ट परिधान करून मोटारसायकलवरून आलेला एक अनोळखी संशयित युवक ग्रामस्थांना दिसला,अशी चर्चा घटनास्थळी होती. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून संशयिताचा शोध घेत आहेत.संशयित आरोपी गोव्याच्या दिशेने पळाल्याचा संशय असून त्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.


