न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथील नवदुर्गेचे घेतले दर्शन

 

सिंधुदूर्ग/ राजू तावडे

शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथील नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासमवेत उपतालुकाप्रमुख राकेश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सांगेली गावचे माजी सरपंच वामन नार्वेकर, माजी सरपंच रमाकांत राऊळ, दीपक सांगेलकर, संतोष नार्वेकर, माडखोल गावचे उपसरपंच जीजी राऊळ, राजन राऊ, वासुदेव होडावडेकर, ॲड.सुरेश आडेलकर त्याच प्रमाणे मंदिराचे प्रमुख गावकर व मानकरी तसेच माजगाव येथील रूपेश नाटेकर, राजू कुबल, दिनेश सावंत,संजय माजगावकर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे