न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड ’

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

‌‌ सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावातील युवा जादूगार वैभव रामदास पारकर (जादूगार वैभवकुमार) यांना पुणे येथील प्रतिष्ठित संस्थेने Artbeats India Excellence Awards या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले. कला व मनोरंजन विभागात कोकणातील उत्कृष्ट जादूगार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.
आर्टबीट्स फाउंडेशन, पुणे तर्फे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध कलाक्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. आर्ट बिटस् ही संस्था गेली २५ वर्षे सातत्याने चित्रकला, शिल्पकला, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. याच प्रतिष्ठित व्यासपीठावर यंदा जादूगार वैभव कुमार यांच्या जादू कलेची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जादूगार वैभव कुमार यांने बांदा गावातून आपल्या कलेची सुरुवात केली. जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख त्याने निर्माण केली. पारंपारिक जादू आणि आधुनिक स्टेज प्रेझेंटेशन यांचा उत्कृष्ट संगम साधत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या सादरीकरणामध्ये हिप्नॉटिझम, सस्पेन्सकाॅमेडी, नाट्यमयता आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची खास शैली त्यांच्या कार्यक्रमात दिसून येते. जादूगार वैभवकुमार यांनी जादू कलेचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित ठेवला नाही, तर सामाजिक प्रबोधनासाठीही केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांनी विविध शाळा व ग्रामीण भागात जादूतुन चमत्कार आणि चमत्कारामागील विज्ञान यांचे शेकडो प्रयोग सादर करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले आहे.
हा पुरस्कार त्यांना मिळाल्यावर भावना व्यक्त करताना जादूगार वैभव कुमार म्हणाले की, “हा सन्मान माझ्यासाठी मोठी प्रेरणा दायी आहे. माझ्या ग्रामदेवतेची कृपा व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने, प्रेक्षकांचे प्रेम, कुटुंबाचा पाठिंबा आणि सततची मेहनत यामुळे हे शक्य झाले.”
कोकणात जादूची एक छोटी अकादमी सुरू करून, या लुप्त होत चाललेल्या कलेला पुनरुज्जीवित करण्याचा त्यांचा मानस आहे. वैभव रामदास पारकर यांच्या या यशाने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

3/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे