न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सैनिक पतसंस्थेचा आर्थिक वर्षात एकत्रित व्यवसाय ४३० कोटी रुपये… संस्थेला ४ कोटींचा निव्वळ नफा

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदूर्ग संस्थेने आपल्या व्यवसायाचा आलेख सातत्याने वृध्दींगत ठेवत सहकार क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. चालु आर्थिक वर्ष सन २०२५ – २०२६ मध्ये संस्थेने एकत्रित व्यवसाय ४३० कोटी रुपयांचा केला आहे. संपूर्ण जिल्हयामध्ये लौकीक प्राप्त करत पतसंस्था उत्तरोत्तर प्रगतीचे टप्पे गाठत आहे. चालु आर्थिक वर्षामध्ये संस्थेला ४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
जिल्हयाभरात संस्थेच्या एकुण २० शाखा कार्यरत असुन १५७ कर्मचारी वर्ग व १६० पेक्षा जास्त कमिशन एजंट सेवा बजावत आहेत. अशा प्रकारे जिल्हयातील ३०० पेक्षा जास्त लोकांना सरळ रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आजच्या या बेरोजगारीच्या युगातही पतसंस्थेने अनेक कुटूंबाना रोजगाराची संधी देऊन मोठा आधार दिलेला आहे. त्याच बरोबर अनेक स्वयंरोजगार करणाऱ्या व्यवसायिकांना नवनविन तरूण तरूणींना स्वयंरोजगारासाठी कर्जरूपाने आर्थिक हातभार दिलेला आहे.
संस्थेकडे कर्जविषयक अनेक योजना कार्यान्वित असुन डिपॉझिटच्या विविध आकर्षक योजनासुध्दा राबवल्या आहेत. अगदी तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत ही पतसंस्था जाऊन काम करत आहे. जनमानसामध्ये एक विश्वासाची भावना निर्माण करण्यामध्ये संस्था यशस्वी झालेली आहे. या यशामध्ये संस्थेचे ठेवीदार, कर्जदार, संचालक, कर्मचारी, सभासद व हितचिंतक अशा सर्वाचे खुप मोठे योगदान राहीलेले आहे. संस्थेने आपला चढता आलेख कायम राखत ही उत्तुंग भरारी घेतलेली आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, व मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ यांनी या सर्व प्रक्रीयेत कर्मचारी वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले म्हणुन त्यांचे खास अभिनंदन केले असुन चालु वर्षी कर्मचाऱ्यांना नफ्यातुन प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतुद केली आहे. त्याचबरोबर सामाजिक व सांकृतिक उपक्रम, खास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सक्षमीकरण निधी, शिक्षण व प्रशिक्षण यासाठी विविध निधींची निर्मीती करण्याचा निश्चय केला आहे. एका सामाजिक जाणीवेतुन हा निधी निर्माण करून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.

सभासदांना चालु वर्षी गत वर्षीपेक्षा जास्त स्वरूपात डिव्हीडंड देण्यासाठीचे नियोजन सुध्दा करण्यात येणार आहे. असा मनोदय संस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, व संस्थेचे मुख्यकार्य कारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संस्थेचे सर्व संचालक व्हा चेअरमन श्री चंद्रकांत शिरसाट, संचालक श्री, दिनानाथ सावंत, श्री. सुभाष सावंत, श्री. भिवा गावडे, श्री. चंद्रशेखर जोशी, श्री .संतोष मुसळे, श्री. शामसुंदर सावंत, श्री. बाबु वरक, श्री. शांताराम पवार, श्री. गोपाळ बाईत यांनी सिंधुदुर्ग जिल्हावासियांचे विशेष आभार व्यक्त केलेले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे