सावंतवाडीतील उद्योजक अनिल गावडे यांना पितृशोक
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सावंतवाडी माठेवाडा येथील रहिवासी प्रभाकर शंकर गावडे यांचे आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी निधन झाले. ते 83 वर्षाचे होते. ते एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. प्रतिष्ठीत उद्योजक अनिल गावडे, इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिक राजन गावडे आणि माठेवडातील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गावडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पक्षात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


