कोलगाव दिर्बादेवीच्या नव्या मंदीराचे भूमिपूजन उद्या
सिंधुदुर्ग| राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील जागृत देवस्थान श्री दिर्बादेवीच्या मंदीराचा जिर्णोद्धार होणार असून नव्या मंदीराचा भूमिपूजन सोहळा येत्या २४मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
श्री दिर्बादेवी देवस्थान हे पुरांपार कोलगाव ,कुणकेरी, आंबेगाव या तीन गावांचे मिळून आहे. जेव्हा कोलगावची त्र्येवार्षिक पडली असते तेव्हा प्रथम कलेश्वर आणि सातेरी यांची तरंगे श्री दिर्बादेवीची भेट घेऊन चव्हाट्यावर येतात… आणि पडली घेऊन तिन्ही गावातून महादेवाचे केरवडे येथे जातात.
श्री दिर्बादेवीचे मंदिर फार जुने असल्याने त्याचा जिर्णोध्दार करण्याचे ठरले. त्यामुळे त्यांचे भूमिपूजन २६ मार्चला होणार आहे .या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून श्री. रामनाथ शामराव बावकर , सचिव श्री.लक्ष्मण महादेव सावंत , तसेच खजिनदार म्हणून न्हानू शिवराम करमरकर हे कार्यभार सांभाळणार आहेत .तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव चव्हाटा आणि श्री दिर्बादेवी देवस्थान कमिटी, मानकरी, आणि कोलगाव ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.


