न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दामिनी पालव हत्येची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्या; पालकमंत्री व पोलीस प्रशासनाकडे साक्षी वंजारी यांची मागणी

सिंधुदुर्ग / राजू तावडे

कुडाळ तालुक्यातील कडावल ते वर्दे मार्गावर दामिनी किरण पालव (वय २०) या तरुणीची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. शांतताप्रिय आणि महिलांसाठी सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी घटना घडणे अत्यंत चिंताजनक असून, आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची गरज सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी यांनी व्यक्त केली आहे.

 

या प्रकरणी राज्याचे पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास गतिमान करावा, यासाठी महिला काँग्रेसतर्फे पालकमंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात येणार असून सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

         प्रमुख मागण्या

१. सखोल व निष्पक्ष तपास: दामिनी पालव हत्या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून दोषी आरोपींचा तात्काळ शोध घ्यावा.

२. परजिल्ह्यातील कामगारांची नोंदणी व पडताळणी: जिल्ह्यात रोजगारासाठी येणाऱ्या परजिल्ह्यातील कामगारांची कायदा व नियमांनुसार योग्य ती ओळख पडताळणी (Police Verification) आणि आस्थापनांमधील अधिकृत नोंदणी प्रशासनाने निश्चित करावी.

३. रेल्वे स्थानके व वाहतूक केंद्रांवर सुरक्षा वाढवणे: कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर तसेच मुख्य वाहतूक केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे.

४. महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता पथके व गस्त वाढवावी.

दामिनीला न्याय मिळेपर्यंत आणि जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तडीस जाईपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसतर्फे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सौ. साक्षी वंजारी यांनी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे