न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील बेफीकीरीबाबत वसंत केसरकर संतप्त 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

     सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट आणि २० डॉक्टर प्रत्यक्ष कुठे आहेत ते दाखवा ? अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी शनिवारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांच्याकडे केली. आरोग्यप्रश्नी प्रसंगी आंदोलन करावे लागेल असा इशारा श्री. केसरकर यांनी यावेळी दिला.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कित्येक वेळ रुग्ण डॉक्टरांची वाट पाहात बसले आहेत. ऑर्थोपेडिक डॉ. निखिल अवधूत कुठे आहेत ? असा प्रश्न केसरकर आणि उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. त्यावर डॉक्टर परिक्षेच्या तयारीला गेल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. इतका वेळ आम्ही डॉक्टरांची वाट पाहात आहोत पण, कोणीही आम्हाला साधी माहिती सुध्दा देत नाही. आम्ही विनाकारण ताटकळत बसलो आहोत, याला जबाबदार कोण ? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. डॉक्टर अधिकृत रजेवर जात असतील तर त्याची माहिती का दिली जात नाही ? असा प्रश्न श्री.केसरकर यांनी केला. आरोग्य प्रशासनाकडून उच्च न्यायालयात वीस डॉक्टर आहेत असा दावा केला जातो. ते वीस डॉक्टर कुठे आहेत ? ट्रामा केअर युनिट असल्याचे सांगितले जाते ते ट्रामा केअर युनिट कुठे आहे ? सक्षम ट्रामा केअर युनिट असेल तर पेशंट बांबोळी येथे का पाठवले जातात, याची उत्तरे द्यावीत. साध्या फॅक्चरचा पेशंट सुध्दा बाहेर पाठवला जातो, असे श्री.केसरकर म्हणाले. त्यावर सी आर्म मशिन आल्यावर हाडांच्या शस्त्रक्रिया होतील, असे डॉ. रेड्डी म्हणाले.

श्री.केसरकर म्हणाले, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आला आहे. त्यानुसार नवीन इमारतीच्या वरच्या मजल्यावर बांधकाम करता येणार नाही. या परिस्थितीत रुग्णालयाचे बांधकाम कुठे होणार ? चार आठवडे आणि आठ आठवड्यात आवश्यक मशिनरी देतो असे आरोग्य संचालकांनी सांगितले आहे. पण, ती मशिनरी ठेवणार कुठे आणि कशी ? आहे तीच जागा रुग्णालयाला पुरेशी होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष न्यायालयात दाखल केलेले आणि जमिनीवरची वस्तुस्थिती यात मोठी तफावत दिसते. यासंदर्भात पुन्हा दोन दिवसांनी उप जिल्हा रुग्णालयास भेट देणार आहे. तेव्हा पूर्ण माहिती द्यावी, काही अडचणी असतील तर त्याही सांगाव्यात. संबधीत अडचणी सोडविण्याचा जरुर प्रयत्न करु. मात्र, आरोग्य प्रशासनाने वस्तुस्थिती मांडावी असे आवाहन श्री.केसरकर यांनी केले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पालकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे