न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

एसएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास उत्स्फूर्त उपस्थिती

 

सिंधुदुर्गनगरी /देवयानी वरसकर

बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, बिबवणे संचलित लक्ष्मीनारायण विद्यालय, बिबवणे आयोजित एसएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रेरणादायी कार्यक्रमास जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अध्यक्ष मा. श्र प्रमोद कामत प्रमुख उपस्थित होते. तसेच  तुकाराम उर्फ दादा साईल, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजाराम सावंत, तेंडोली जिल्हा परिषद सदस्या  सौ. आरती पाटील आणि माजी शिक्षण सभापती  पेडणेकर यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचेही कौतुक करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची वाट आत्मविश्वासाने चालण्याचा, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, मेहनत आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पालक, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस नवी प्रेरणा मिळाली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे