न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा शिष्टमंडळाची अधिक्षक अभियंता महावितरण सिधुदुर्ग यांच्यासोबत बैठक 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

    विद्युत महावितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यासोबत आज मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील कार्यालयात बैठक घेऊन सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात चालू असलेल्या विजेच्या गंभीर समस्येबाबत चर्चा केली. तसेच अनेक गावांमध्ये अद्याप वायरमन नाही त्या संदर्भात माहिती घेऊन ज्या गावांमध्ये वायरमन नाहीत अशा गावांना वायरमन उपलब्ध करून देण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली. यावेळी सध्या चालू असलेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात विजेचा खेळखंडोबा सुरू असून यावर वेळीच योग्य त्या उपयोजना करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला. यावेळी लवकरात लवकर सावंतवाडी तालुक्यातील विजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधिक्षक अभियंता महावितरण यांच्याकडून देण्यात आले. ही बैठक जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे व सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्या, कास सरपंच प्रविण पंडित, सांगेली सरपंच लवू भिंगारे, गेळे सरपंच सागर ढोकरे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, शंकर सावंत, गणेशप्रसाद पेडणेकर, तसेच भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे