न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

तुकोबाराय निघाले पंढरीस… आजचा मुक्काम ईनामदारवाड्यात

देहू (पुणे)/ 

ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी मंगळवारी दुपारी देहूतून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. संपूर्ण देहूनगरी प्रस्थान सोहळ्यामुळे भक्तिचैतन्यात दंग झाली होती. पालखीचा पहिला मुक्काम देहुतच इनामदारवाड्यात असणार आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यंदा ३४१ वा पालखी सोहळा असून प्रस्थान सोहळ्याची सुरुवात पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झाली. शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा झाली. इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले.

दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी पालखीने प्रस्थान केले.  रात्री इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. उद्या बुधवारी सकाळी पालखी पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे