उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दत्तक घेतल्या जि.प.च्या दोन शाळा
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आदर्श घेऊन सावंतवाडीतील जिल्हा परिषद शाळा नंबर ४, व शाळा नं. ५ या दोन शाळा दत्तक घेत असल्याची घोषणा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली. माझेही शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. आज या शाळेच्या मुलांनी मिळवलेल यश कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या मेहनतीला दाद द्यावी तेवढी थोडी आहे, असे उद्गार ॲड. निरवडेकर यांनी काढले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. ४ येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, छावा संघटना अध्यक्ष संतोष तळवणेकर, मुख्याध्यापक महेश पालव, साईनाथ जामदार, शेलेस्तीन फर्नांडिस,शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी, शिक्षीका सौ पूजा शिंदे, सौ. अनघा निरवडेकर, सौ. लक्ष्मी धारगळकर, सौ. अंजना घाडी, सौ. प्रणिती सावंत, सौ. दक्षता गवस, सौ. वर्षा नाईक, सौ. शिल्पा जाधव आदींसह अंगणवाडी सेविका सरीता भिसे शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केलेल्या प्रशालेतील मुलांचा गौरव यावेळी करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षीस देत गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ॲड. निरवडेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश पालव यांचा वाढदिवस देखील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
सावंतवाडी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, पत्रकार हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस, छावा संघटना सावंतवाडीचे अध्यक्ष संतोष तळवणेकर आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केली.
यावेळी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक म्हणाले. जिल्हा परिषद शाळांना कोणतीही कमी पडू देणार नाही. रिक्त असलेल्या पदावर चांगले शिक्षक लवकरात लवकर देऊ असा शब्द श्री. मुळीक यांनी दिला. तसेच या शाळेला आणखी एक शिक्षक देण्याची मागणी मुख्याध्यापक आणि केले याला उपसभापती मुळीक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


