आंबोलीत वर्षा पर्यटनाला सुरूवात… व्हिडिओ पहा
संतोष मुळीक
पाऊस म्हटलं की आपसूकच आंबोली नजरेत समोर येते… वर्षा पर्यटनाची राजधानी म्हटलं तर वावगं ठरू नये. यंदा पावसाने उशिर केला आणि पर्यटकांसह स्थानिकांची हिरमोड झाली होती. मात्र पावसाने सात दिवसांत आपली उपस्थिती दमदार दाखवत आंबोलीतील वर्षा पर्यटनाला सुरूवात करून दिली आहे.
आज रविवार हजारो पर्यटकांनी आंबोलीत मनसोक्त धबधब्यांचा आनंद लुटला. महाराष्ट्र आणि गोव्यासह कर्नाटक, तेलंगणा, गुजरात मधून पर्यटक आले होते. पोलीसांच्या योग्य नियोजनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली नाही…. मात्र पुढच्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होणार आहे.त्यामुळे साईड पट्टी डागडुजी आणि पोलीसांनी कुमक आवश्यक आहे. वनविभागाने यंदा २० रू. उपद्रव शुल्क सुरू केले आहे.



