पन्हाळ्यावर कारवर झाड कोसळले
कोल्हापूर/ वृत्तसंस्था
पन्हाळ्यावर मुसळधार पावसामुळे आज तीन ठिकाणी झाडे कोसळली.
आंधरबाव – लता मंगेशकर बंगला रस्त्यावर प्रकाश गवंडी यांच्या मोटारीवर आंब्याचे मोठे झाड पडून वाहनाचे मोठे नुकसान झाले.
तर सादोबा दर्ग्याजवळ आणि अंबरखाना परिसरात झाडे पडल्याने रस्ते बंद झाले व दोन वीज खांब वाकले.
गरपरिषद आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करून झाडे हटवत रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. पर्यटकांची गर्दी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.”


