रत्नागिरीकर पिताहेत गढुळ पाणी…. तुकाराम मुंडेंनी लक्ष देण्याची मागणी
रत्नागिरी/ मेघेश मोंडकर
राज्यात अन्नसुरक्षा संदर्भातील नियम न पाळणाऱ्या आस्थापनांवर धडकेबाज कारवाई करणा-या तुकाराम मुंडेंनी रत्नागिरी नगरपालिकेवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे. गढुळ पाणी मिळत असल्याने रत्नागिरीकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
रत्नागिरी शहराला मिरजोळे जवळील शिळ धरणातून पाणी पाणीपुरवठा होतो. साळवी स्टॉप येथील पाण्याच्या टाकीतून पुरविले जाणारे पाणी अत्यंत दुषित येत आहे. वारंवार सांगूनही नगरपालिका आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने रत्नागिरीकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे तुकाराम मुंडेंनी यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


