न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नाशिक अपघातात जोगेश्वरीतील चार जण ठार

मुंबई /वृत्तसंस्था

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. शहापूर तालुक्यातील अटगाव जवळ दोन वर्षांपूर्वी जळालेल्या उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील हे सर्व कुटुंब जोगेश्वरी येथील रहाणारे होते. ते देव दर्शनासाठी कुटुंबासह त्र्यंबकेश्वरला गेले होते. देवदर्शन आटपून परतीच्या प्रवासाला असताना अटगाव जवळ हा भिषण अपघात झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे