सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हमीपत्रा संदर्भात उद्या कोल्हापूर खंड पिठात सुनावणी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील ट्रामा केअर युनिट, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे यासंदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या हमी पत्रासंबधी उद्या गुरुवारी (ता.१७) कोल्हापूर सकिँट बेंच मध्ये सुनावणी होणार आहे.
सुनावणीस आरोग्य संचालक यांना व्हिसी व्दारे हजर राहाण्याच्या न्यायालयाच्या सूचना आहेत. अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तफेँ दाखल जनहित याचिकेप्रकरणी वकिल महेश राऊळ बाजू मांडतील. आरोग्य संचालक यांनी चार आठवड्यात ट्रामा केअर युनिटची मशिनरी देण्याचे आणि रिक्त पदे भरण्याचे हमी पत्र दिले होते. त्या शिवाय सी आर्म ही हाडांच्या शस्त्रक्रियेसंबधीची मशिनरी आठ आठड्यात देण्याचे हमीपत्र दिले आहे. सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी अद्याप कायम स्वरुपी पदावर कोणीही वैद्यकीय अधिकारी हजर झाले नसल्याचे सांगितले आहे.


