न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

स्पेन अनेक विक्रमांसह जग्गजेता

वृत्तसंस्था/

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने जेतेपदच मिळवलं नाही तर काही विक्रमही रचले आहे. अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेत खेळलेल्या खेळात स्पेनने एक गोल मारला आणि विजयी ट्रॉफीवर मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून स्पेनने इटलीचा विश्वविक्रम मोडला

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाला पराभूत केलं. मग इटलीचा विक्रम मोडण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. या रेकॉर्डचा संबंध विजयाशी आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक वेळा विजयी राहण्याशी निगडीत आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यातील विजय पकडून हा स्पेनचा सलग 38वा विजय होता. स्पेनने 2024 पासून आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. यापूर्वी सलग सामने जिंकण्याचा विक्रम इटलीच्या नावावर होता. इटलीने 2018 ते 2021 या कालावधीत 37 सामने सलग जिंकले होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे