न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपाच्या वतीने सावंतवाडी मतदारसंघात योगा सेंटर सुरू करणार: विशाल परब 

 

सिंधुदूर्ग / राजू तावडे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही शहरांमध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच विविध भागांत योगा सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे भाजपा युवानेते विशाल परब यांनी सांगितले.

सावंतवाडी येथील मांगिरीश हॉलमध्ये फिटनेस योग फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना रविवारी विशाल परब यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे योग हा केवळ व्यायामाचा प्रकार न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला पाहिजे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागात योगाविषयी जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना योगाभ्यासाकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच स्थानिक पातळीवर योगा सेंटर सुरू करून नागरिकांना नियमित योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे विशाल परब यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला योग प्रशिक्षक शेखर बांदेकर , संस्थेचे यशवंत आरोसकर, शिवा गावडे, सौ. निशिगंधा सावंत, रेवती सावंत तसेच योग प्रशिक्षण शिबिरातील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे