न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर..गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी गुलदार प्रकल्पाची निवड

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ची प्रतिष्ठित Golden Banyan Award साठी निवड झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’ अंतर्गत ‘Best Innovation/Product’ आणि ‘Best Creative/Campaign’ या दोन श्रेणींमध्ये पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

 

या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निमंत्रण पाठवले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान जिल्हा प्रशासनाने केलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याची दखलही या पत्रातून घेण्यात आली आहे.

 

समुद्राखालील पर्यटनाचा अनोखा अनुभव देणारा ‘EX-INS गुलदार’ प्रकल्प कोकणातील पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सागरी वारसा, कृत्रिम प्रवाळभित्ती आणि पाण्याखालील संग्रहालयाच्या माध्यमातून पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

२७ ऑक्टोबरला नवी दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पत्रानुसार, गुरुवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्ली येथील द ओबेरॉय, प्रेसिडेंट्स म्युझियम अँड लायब्ररी, तीन मूर्ती मार्ग येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.

या निवडीमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली असून, कोकणातील सागरी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. ‘Golden Banyan Award’ साठी झालेली निवड म्हणजे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे