न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाआरोग्य शिबिराचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

       सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते संपन्न झाले.

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले आहे‌. २० तज्ञ व इतर ७० डॉक्टर उपस्थित असून रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, रुग्ण कल्याण समिती सदस्य आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी, जिल्हा सचिव परिक्षीत मांजरेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, क्लेटस फर्नांडिस, आबा केसरकर, विश्वास घाग, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, राजश्री निर्गुण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदिप सावंत तसेच के.एल.ई. हॉस्पिटलचे १०० हून अधिक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचीही यावेळी उपस्थिती होती. या महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहत लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे