जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव प्रथम
सिंधुदूर्ग / राजू तावडे
सावंतवाडी माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिरात सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळविला. माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील २२ गायक-गायिकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत जयेश जाधव यांनी ‘सोचेंगे तुम्हें प्यार करे के नही…’ हे गाणे सादर करत २३३ गुण मिळवून विजेतेपद मिळविले. तर रविंद्र प्रभू यांनी ‘तेरे आँखों के सिवा दुनिया मे रखा क्या है…’ या गाण्यावर २३२ गुण मिळवत उपविजेतेपद मिळविले. प्रशांत हळदणकर यांनी ‘चेहरा है या चाँद खिला…’ हे गाणे गाऊन २१२ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. सानिका सासोलकर, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नेत्रा हर्षल भांगले त्यांना देण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सम्राट क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव प्रतिभा चव्हाण, कौस्तुभ पेडणेकर, डॉ. सोनल लेले, गुरुप्रसाद चिटणीस, माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गावडे, संतोष सावंत, दिलीप सांगावकर, बबलू मिशाळ तसेच वैभव केंकरे, अमिषा सासोलकर, लक्ष्मीकांत सासोलकर यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीत विशारद ॲड. सिद्धी परब, सौ.स्मिता केंकरे आणि कु श्रुती सावंत यांनी काम पाहिले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुटसुटीत आणि प्रभावी सूत्रसंचालन आणि आभार गुरुप्रसाद चिटणीस यांनी केले.


