न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी ‘समता प्रेरणा भूमी’चा परिसर स्वच्छ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा पुढाकार

सिंधुदुर्ग /राजू तावडे

      सावंतवाडी शहरातील जिल्हा कारागृहाशेजारी असलेल्या ऐतिहासिक ‘समता प्रेरणा भूमी’ या वास्तूला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाची पवित्र स्मृती लाभली आहे. २२ ऑक्टोबर १९३२ रोजी एका खटल्याच्या निमित्ताने सावंतवाडीत आल्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची या प्रेरणाभूमीच्या ठिकाणी उपस्थिती लाभली होती. हीच ऐतिहासिक भूमी अधिक पवित्र मानत, रविवारी २५ ऑक्टोबर रोजी येथे आंबेडकर अनुयायांतर्फे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा समाजकल्याण सभापती ॲड. अनिल निरवडेकर यांनी स्वतः पुढाकार घेत समता प्रेरणा भूमी परिसराची स्वच्छता आणि बंद अवस्थेत असलेल्या कारंज्याची डागडुजी करून हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर आणि अपार प्रेम भावना व्यक्त करत ॲड. अनिल निरवडेकर यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या मोहिमेचे नेतृत्व केले. कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि या पवित्र वास्तूचे पावित्र्य व सौंदर्य कायम राहावे, यासाठी त्यांनी उपस्थित राहून संपूर्ण परिसराची स्वच्छता करून घेतली. तसेच बऱ्याच दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले कारंजेही पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि ॲड. निरवडेकर यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे ‘समता प्रेरणा भूमी’चा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. आंबेडकर अनुयायांनीही याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे