न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे सावंतवाडीत “जीवनरक्षक ” अभियान 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 आज सर्वसामान्य माणूस ताणतणावाखाली जीवन जगत आहे. त्यामुळे अपघात व हृदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याकरीता सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संस्थेने प्रत्येक माणसाची काळजी घेण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्या उपक्रमाचे नाव जीवनरक्षक अभियान आहे.

रात्री नऊ ते पहाटे सहा पर्यंत जीवनरक्षक अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीस आवश्यकता भासल्यास २४ तासात ही सेवा सावंतवाडी शहरांतर्गत उपलब्ध असणार आहे. तरी रात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागले किंवा कुठेही अपघात झाल्यास सदर व्यक्तीला ॲम्बुलन्सद्वारा सावंतवाडी शहरातील कुठल्याहि हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी थेट सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा. अवघ्या काही मिनिटातच संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचतील व सदर पेशंटला किंवा अपघात ग्रस्ताला तत्काल वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल.

जीवनरक्षक म्हणून ही सेवा संस्थेमार्फत विनामूल्य देण्यात येणार असल्याचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी सांगितले. या जीवनरक्षक उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक,संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील,रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, हेलन निबरे, शेखर सुभेदार, शरदिनी बागवे, अशोक पेडणेकर व शामसुंदर हळदणकर सहकार्य करणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे