न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाकडून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कचा परतावा

सिंधुदुर्ग / राजू तावडे  

महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीबाबत शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील विद्यापीठांना आवश्यक कार्यवाहीसंदर्भात निर्देश दिले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने तातडीने परिपत्रके जारी करून संलग्न महाविद्यालयांना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले.या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. रविंद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू मा.प्राचार्य अजय भामरे, डॉ. पूजा रौंदाळे, डॉ. प्रसाद कारंडे, तसेच विद्यापीठातील इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त), सावंतवाडी यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची प्रक्रिया प्राधान्याने हाती घेतली. संस्थेचे व्यवस्थापन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, टास्क फोर्सचे सदस्य आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करत या प्रक्रियेत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
महाविद्यालयातील एकूण १,२५६ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा परतावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने स्वतंत्र धनादेश (चेक) देण्यात आले आहेत. यामुळे शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम थेट संबंधित विद्यार्थ्याला मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संस्थेच्या चेअरमन सौ. शुभदादेवी भोंसले आणि मुंबई विद्यापीठ सिमेंट सदस्य लखमराजे भोंसले यांनी मार्गदर्शन केले. उर्वरित विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही महाविद्यालय प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे