सावंतवाडी स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य …… युवा नेते विशाल परब
सिंधुदुर्ग / राजू तावडे
भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे “स्वच्छता सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सन्मान करून त्यांना आरोग्य विषयक वस्तू भेट देण्यात आल्या.
हा उपक्रम भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी स्वच्छता कामगारांना आवश्यक आरोग्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. समाजाच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता कामगारांचे योगदान अनमोल असल्याचे सांगत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक राजू बेग, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, राजे प्रतिष्ठानचे शिवा गावडे, मंडल चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.


