न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भोसले इन्स्टिट्यूटच्या ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सीमध्ये निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले यश…

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

सावंतवाडीतील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग या जहाज डिझाईन क्षेत्रातील कंपनीत यशस्वी निवड झाली आहे. कॉलेजमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू दरम्यान ही निवड करण्यात आली. बॉयन्सी कन्सल्टंट्स ही मरीन इंजिनिअरिंग व शिप डिझाईन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून जहाजांचे डिझाईन, ऑफशोअर प्रोजेक्ट्स, थ्री-डी मॉडेलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच जहाजांच्या दुरुस्ती व रूपांतरणाशी संबंधित सेवा पुरवते. भारतासोबतच कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर असून अमेरिका, नॉर्वे, सिंगापूर आदी देशांतील प्रकल्पांसाठी कंपनी सेवा पुरवते._

_या कॅम्पस ड्राइव्हमध्ये कंपनी प्रेझेंटेशन, लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू अशा विविध टप्प्यांद्वारे निवड प्रक्रिया पार पडली. यात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पैकी ६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. मुलाखतींचे यशस्वी नियोजन कॉलेजचे टीपीओ हेड मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील व इलेक्ट्रीकल अधिव्याख्याता समित निर्मळकर यांनी केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या._

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे