न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कारीवडे येथील अपघात संतोष गुळदवेकर जखमी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

काल रविवारी रात्री बाराच्या सुमारास माडखोल येथे संतोष गुळदवेकर यांना अपघात झाला. घरी मोटरसायकलीने जात असताना त्याला अचानक झोप आली व समोरून येणाऱ्या गाडीला त्याने जोरदार टक्कर दिली असता त्या अपघातात त्याच्या दोन्ही हातांनी गंभीर दुखापत झाली.
गोठण देवस्थान कारिवडे येथे संतोष गुळदवेकर वय 23 वर्षे हे एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजती म्हणून काम करतात. रात्री नाटक संपल्यावर रात्री 12 च्या रुमारास माडखोल येथे आपल्या घरी मोटरसायकलीने जात असताना त्यांना अपघात झाला.
त्या प्रसंगी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी निलेश राऊळ त्यांचे सहकारी शरद पवार, व सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तत्काळ त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याची कल्पना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना दिली असता, रवी जाधव हॉस्पिटलमध्ये पोचले व त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी येथे पाठवण्यात आले.
आज सकाळी रवी जाधव यांनी त्यांच्या नातेवाईकांची संपर्क साधला असता त्याची प्रकृती चांगली असल्याचे समजले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर व हॉस्पिटल कर्मचारी निलेश राऊळ यांचे मदत कार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे