माऊली माऊली रूपं तुझे….
पुणे/ प्रतिनिधी
लागलीस आस पंढरीची… माऊलींच्या पालखीने पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आज माऊली पुण्यनगरीत आली आहे. इथे दोन दिवस मुक्काम करून शनिवारी पालखी सासवडला सोपानकाकांच्या भेटीला जाणार आहे. या दरम्यान दिवे घाटातील थाट अनुभवायला हजारो भाविक हजर असतात. सध्या पुण्यात दर्शनासाठी गर्दी झाली आहे.


