न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूर हादरलं… भर दिवसा पत्नीवर सपासप वार करून संपविले… पेठवडगाव शहरातील घटना

कोल्हापूर / वृत्तसंस्था

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या पेठवडगाव शहरात काल बुधवारी सायंकाळी एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीचा भररस्त्यात, गजबजलेल्या बाजारपेठेत कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. विशेष म्हणजे, या कृत्यापूर्वी आरोपीने मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवून हत्येचा इशारा दिला होता. भर पावसात घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

संशयित दीपक कांबळे (वय 35, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) याने हे भयानक पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर एक धक्कादायक स्टेटस ठेवला होता. ‘आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी शेवट’, अशा आशयाचा संदेश त्याने सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या डिजिटल पुराव्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अमृता कांबळे (वय 30) या एसटी स्टँडच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी दीपक तिथे पोहोचला आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वादाचं रूपांतर हिंसाचारात झालं आणि दीपकने आपल्याजवळील धारदार कोयत्याने अमृता यांच्यावर हल्ला चढवला. त्याने अमृता यांच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले, ज्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळल्या. पावसाची संततधार सुरू असतानाच घडलेल्या या घटनेनं परिसरात रक्ताचा सडा पडला होता

हा भयानक प्रकार सुरू असताना परिसरातील काही धाडसी तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीपकने त्यांना अत्यंत उद्धटपणे आणि थंड डोक्याने उत्तर दिले. ‘ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका,’ असे ओरडून त्याने मध्यस्थी करणाऱ्यांना दूर सारलं आणि अमृता यांच्यावर पुन्हा वार केले. त्यानंतर ‘विषय संपवला’ असं म्हणत आणि मिशीवर ताव मारत घटनास्थळावरून तो फरार झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे