राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुभाष बोवलेकर यांची चमकदार कामगिरी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
नुकतीच मुंबई वरळी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र एअर अँड फायरआर्म कॉम्पिटिशन मध्ये उपरकर शूटिंग अकॅडमीचे श्री.सुभाष चंद्रकांत बोवलेकर (वेंगुर्ला) यांनी 50 मीटर .22 रायफल प्रोन प्रकारात सहभाग घेऊन 600 पैकी 525 गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला.तसेच यापूर्वी मुंबई येथेच झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत श्री.बोवलेकर यांचा चिरंजीव कु.प्रतिक याने याच इव्हेंट मध्ये सहभाग घेऊन चौथा क्रमांक पटकविला होता. या दोघांची गोवा येथे होणाऱ्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पिनशिप व पंजाब, मोहली येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी.व्ही.मावळणकर शूटिंग चॅम्पिनशिप स्पर्धे साठी निवड झाली आहे.सदरचे खेळाडू उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ला येथे सराव करत असून त्यांनी .22 प्रोन प्रकारचा सराव रत्नागिरी येथे केला. त्यांना उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर, रत्नागिरीचे प्रशिक्षक श्री. पुष्कराज इंगोले तसेच अँड.श्री विक्रम भांगले यांचे प्रशिक्षण व मौलिक मार्गदर्शन लाभले.निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंची सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


