न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत चतुर्थी सणात स्थानिक व्यवसायिकांना प्रथम प्राधान्य द्या, उबाठा शिवसेनेचे आशिष सुभेदार

सिंधुदुर्ग /  राजू तावडे 

   सावंतवाडी शहरात गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक फळ, फूल, भाजी विक्रेते तसेच स्थानिक व्यवसायिकांना नगरपालिकेने प्रथम प्राधान्य द्यावे. या ठिकाणी परप्रांतीय व्यावसायिकांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

गणेश चतुर्थी सणाला थोडेच दिवस बाकी आहेत. या सणाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात दरवर्षी प्रमाणे भाजी, फळे, फुले, वस्तू सजावटीचे सामान, घेऊन मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय विक्रेते दाखल होतात. हे विक्रेते आपली मुजोरी दाखवत बहुतांशी जागा अडवून ठेवतात. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होतात. शहरात दरवर्षी गणेश चतुर्थी सणाला होणारी गर्दी पहाता नगरपालीकेकडून नियोजन केले जाते. भाजी, फळ, फूल, विक्रेते यांना वेगळी जागा ठरवून दिली जाते. मात्र तुलनेने स्थानिक व्यापारी विक्रेते यांच्या नशिबी फार कमी जागा येते. त्यामुळे दरवर्षी ऐन गणेशोत्सवात स्थानिक विक्रेते व्यावसायिक व्यापारी यांच्यावर पालिका प्रशासनाकडून अन्यायच होत आला आहे. यावर्षी सणा सुदिला स्थानिकांना जागा वाटपात जास्त प्राधान्य प्रशासनाने द्यावे, परप्रांतीय व्यावसायिक यांची वाढणारी मक्तेदारी यावेळी खपवून घेतली जाणार नाही. यामध्ये मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी लक्ष घालून यंदाच्या गणेशोत्सवात स्थानिक विक्रेते व्यापारी व्यावसायिक यांना प्रथम प्राधान्य द्यावे, अन्यथा उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने प्रशासनाला घेराव घालण्यात येईल. असा इशारा उबाठा शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे